ओवारा येथे नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्या : सविता पुराम
देवरी 04: माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सचिव संजय पुराम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागपूर येथील श्री स्वामी समर्थ नेत्रालय व संजय पुराम मित्र परिवाराच्या वतीने देवरी तालुक्यातील ओवारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी केले आहे.