देवरी येथील सिता पब्लिक स्कूल मध्ये शालेय मंत्रीमंडळाची निवडणूक उत्साहात
■ लोकशाहीची मुल्ये विद्यार्थीदशेतच अंगी यावी म्हणून गुप्त मतदान पद्धतीने शाळेतच मतदान पार पाडली
प्रतिनिधी / देवरी,ता.०४: सिता एज्यूकेशन सोसायटी देवरी अंतर्गत संचालित देवरी येथील सिता पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध पदासाठी विद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणूकीसाठी निवडणूक शुक्रवार रोजी पार पडली.
लोकशाहीची मुल्ये विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांच्या अंगी यावी म्हणून विद्यालयात गुप्त मतदान पध्दतीने मतदान घेण्यात आले. ही प्रक्रिया शाळेचे प्राचार्य कमलेश फुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक शिक्षक एस.एस.बिंझलेकर हे होते. या निवडणूकीत वर्ग पहिला ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मतदान केले. यात शाळाप्रतिनीधीसाठी होमेश बोरकर,कु. आर्या सेलोकर तर क्रिडा प्रतिनीधी साठी क्षितीज भैसारे, कु.प्रिया बिंजेवार आणी सांस्क्रुतीक विभाग प्रमुख लोकेश शाहू,डिंपल निरवान व शिस्त प्रमुख कु.रूतुजा वासनीक ,दिशांत मरसकोल्हे तसेच स्वच्छता विभाग प्रमुख अभय पोले ,कल्याणी हरदुले तर स्नेहसम्मेलन प्रमुख सादीक मेमन, प्रियानी पटले आणी सहल विभाग प्रमुख हर्ष राऊत व दिव्या पंधरे या विद्यार्थ्यांची निवड निवडणूकीतून करण्यात आली.
हि निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी शाळेतील सहाय्यक शिक्षक डब्लु. एस. बडवाईक,ब्रजेश सुलाखे, ओम दशरिया,श्रीमती शिवणकर व इतर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.