मिसपिर्री येथे दहावी व बारावी परिक्षेच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

■ मिसपिर्री ग्रा.पं तर्फे सत्कार गुणवंताचा वाटचाल प्रगतीचा हा अभिनव उपक्रम.

■गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५००/-,१०००/- व ५००/- रू रोख पुरस्काराचे वाटप

प्रतिनिधी / देवरी,ता.०४: देवरी तालुक्यातील अंतिम टोकावर असलेल्या अतिदुर्गम आदिवासी गाव म्हणून ओळख असलेल्या गट ग्रामपंचायत येथे गाव परिसरातील दहावी व बारावी शालांत परिक्षेत उत्तीर्ण होउन गुणवंत प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम गुरूवार रोजी पार पडले. हा कार्यक्रम सत्कार गुणवंतांचा वाटचाल प्रगतीचा अभिनव उपक्रमा द्वारे राबविण्यात आला.यात ग्रा.पं.परिसरातील दहावी व बारावीच्या परिक्षेत गुणवंत प्राप्त करणा-या प्रथम,द्वितीय आणी त्रुतीय क्रमांक मिळवीणा-या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र व अनुक्रमे १५००/-, १०००/- व ५००/- रोखपुरस्कार देऊन गौरांन्वीत करण्यात आले
या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिसपिर्रीचे सरपंच रसवंतीताई उसेंडी ह्या होत्या.या प्रसंगी गावचे उपसरपंच जिवन सलामे,ग्रा.पं.सदस्य खेमराज वालदे,संतोष नरेटी,कमलाताई सयाम,रमोतीताई कुंभरे,नितूताई हलामी, सिक सेंदूर, ग्रामविकास अधीकारी एस.आर वाघमारे, प्रतिष्ठित नागरीक नरेन्द्र नंदेश्वर,मोहन सयाम, इंन्द्रपाल भैसारे, भगवान टेकन, रोजगार सेवक धन्नालाल सयाम,कुशन गोटा,चातूर मडावी, मोहन दर्रो, आरोग्य सेवीका श्रीमती थोटे, आरोग्य सेवक श्री टेभूंर्णे, आगणवाडी सुपर वाईजर शोभा राऊत यांच्यासह मिसपिर्रीचे ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌ यावेळी उपसरपंच जिवन सलामे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे. जो प्राषन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. हा संदेश भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. याकरिता सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे.फक्त शिक्षण घेवून चालणार नही तर या स्पर्धेच्या युगात आपल्या मनात प्रती स्पर्धेत भाग घेण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. आज आपल्या मोठ्या भावंडांचा सत्कार झाला आहे. उद्या आपलाही सत्कार व्हावा म्हणून या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शिक्षणक्षेत्रात मेहनत घेवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे. अशाप्रकारची प्रेरणा परिसरातील इतर विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून ग्रामपंचायत ने हा सत्कार गुणवंतांचा वाटचाल प्रगतीचा हा अभिनव उपक्रम राबवित आहे असे म्हटले.‌ या कार्यक्रम दरम्यान मिसपिर्री परिसरातील दहावी व बारावी च्या परिक्षेत गुणवंत प्राप्त एकूण १३ विद्यार्थ्यांचे प्रथम,द्वितीय,व त्रुतीय क्रमांक प्राप्त करणा-यांना सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र व अनुक्रमे १५००/- १०००/- आणी ५००/- रूपये रोख पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करूण गौरांवीत करण्यात आले.‌ या कार्यक्रमाचे प्रास्तावीक क्याम्प्यूटर आफरेटर मनोज बडवाईक यांनी तर संचालन गजेन्द्र हिरवानी यांनी आणी उपस्थितांचे आभार संदिप धामगाये यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share