महामहिम राष्ट्रपती यांचा अपमान करणाऱ्या खासदाराला अटक करा : भाजप महिला आघाडी देवरी यांचे पोलीस स्टेशनला निवेदन

देवरी 4: आदिवासी हे देशाचे मुळ निवासी असून आज पर्यंत कोणताही सर्वोच्च स्थान या देशाच्या आदिवासीला मिळालेला नव्हता. आता द्रोपदी मुर्मू भारताच्या सर्वोच्च पदावर म्हणजे महामहिम् राष्ट्रपती झाल्या परंतु हा पद भारतीय जनता पक्षाने गरीब कुटूंबातील एका आदिवासी महिलेला दिले. हे त्यांच्या पोटात दुखू लागले म्हणून त्याने कटपुतली आहे असा हिन शब्दात त्यांचाच नव्हे तर आदिवासी समाजाचा तिरस्कार करण्याचे काम केले आहे. संसदमध्ये काँग्रेसचा नेता चौधरी या खासदाराने चक्क आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी यांना राष्ट्रपत्नी म्हणून त्यांनी या देशाचाच नव्हे तर या देशातील सर्व नागरीकांचा, या देशातील सर्व महिलांचा, या देशातील सर्व आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. अशा या अधिरंजन चौधरीला देशाचे सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या राष्ट्रपती याचा अपमान केला म्हणून यांना कडक शिक्षा व्हावी. यासाठी भाजपच्या वतीने निवेदनातून मागणी केली आहे.

यावेळी भाजप महिला आघाडीचे देवकी मरई , अंबिका बंजार, नूतन सयाम , सीता रंगारी , ममता अंबादे , श्यामकाला गावळ , अंजु बिसेन , सविता पुराम , कौशल कुंभरे , कल्पना वालोदे , तेजश्री चोपकर , रचना उजवणे आदी उपस्थित होते.

Share