“आजादी का अमृत महोत्सव” साजरा करण्याच्या उद्देशाने देवरी नगर पंचायत मार्फत विविध स्पर्धेचे आयोजन

देवरी 04: स्वातंत्र्याचा ७५ वर्षानिमित्ताने ” आजादी का अमृत महोत्सव” साजरा करण्याच्या उद्देशाने देवरी नगर पंचायत मार्फत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी तसेच सर्व नागरीकांनी सहभाग घ्यावा असे पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे .

निबंध स्पर्धा विद्यार्थी व सर्व नागरीकांकरीता असून विषय : १) स्वातंत्र्याचा ७५ वर्षे पुर्ण (अमृत महोत्सव ) २) मी पंतप्रधान झालो तर
३) स्वच्छ देवरी, सुंदर देवरी, हरीत देवरी
निबंधाची मर्यादा ५०० शब्द इतकी असून निबंधाची भाषा इंग्रजी, मराठी, हिंदी असेल.
स्पर्धाकांनी दिनांक १०/०८/२०२२ पर्यत नगर पंचायत कार्यालय देवरी येथे निबंध सादर करावे असे पत्रकात म्हंटले आहे.

प्रथम पारितोषिक 1000/- व्दितीय पारितोषिक 701/- तृतीय पारितोषिक 501/- व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे आणि वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थी व सर्व नागरीकांकरीता आयोजित केल्या असून त्यांचे प्रवेश निशुल्क राहील. स्पर्धेकरीता नाव नोंदणी दिनांक १०/०८/२०२२ पर्यत करण्यात येईल.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावे असे नगर पंचायत देवरी च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share