नक्षलग्रस्त भागातील नागरिक करतात जीवघेणा प्रवास

◼️अतिदुर्गम आदिवासी भागात 20 किलोमिटर अंतरापर्यंत खड्डेच खड्डे
◼️नागरिकांच्या बरोबर विद्यार्थ्याना होतो नाहकत्रास
देवरी :- गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी आणि नक्षल ग्रस्त असलेल्या देवरी तालुक्यातील चिचगड पासून ककोड़ी पर्यंत हा 20 किलोमीटर अंतरावरील रस्ते खड्डेमय झाले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशा प्रश्न आता परिसरातील नागरिक, विध्यार्थी यांना पडला आहे. या मार्गावर अनेकदा अपघात होत असूनही या मार्गाकळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे याच मार्गाने हजारो जळ वाहने जवळच्या छतीसगड राज्याची सीमा असल्याने अवागमन करीत असतात.

Share