ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे नागपंचमी निमित्त सर्पमित्र आणि विद्यार्थी परिसंवाद
◼️नागपंचमीच्या पर्वावर चिमुकल्यांनी जाणून घेतली सर्पमित्रांकडून सापांची माहिती आणि घ्यावयाची काळजी
देवरी 02: सापाचे अन्नसाखळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील कीटक, डासांच्या अळ्या, घुशी यांवर साप नियंत्रण ठेवतो. एक धामण वर्षात शेकडो उंदीर- घुशी खाते. सापाचे उंदीर पकडण्याचे तंत्र परिणामकारक आहे. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर या निसर्गमित्राला जपण्याबरोबरच सर्पाविषयी जनजागृती करण्यासाठी ब्लॉसम स्कुलचे प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून सर्प मित्र देवेंद्रपालसिंग सिद्धू यांचा नागपंचमी निमित्त परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुजित टेटे , प्रमुख अतिथी सर्पमित्र देवेंद्रपाल सिंग सिद्धू , शिक्षक विश्वप्रित निकोडे , सरिता थोटे , चंद्रकांत बागडे तेजश्री राऊत, गुंजन जैन उपस्थित होते.
नागपंचमीच्या पर्वावर चिमुकल्यां विद्यार्थ्यांना सर्पमित्रांकडून सापांची माहिती आणि घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्पविषयाची माहिती जाणून घेतली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोहुर्ले यांनी केले असून आभार योगिता कोसरकर यांनी मानले.