देवरी येथील वार्ड क्र ७ व १६ मध्ये विविध विकास कामाचे शुभारंभ

■ आमदार कोरोटे यांच्या हस्ते विविध कामाचे भुमीपूजन

प्रतिनिधी /देवरी ०१: नगरपंचायत देवरी अंतर्गत येणा-या येथील वार्ड क्रं. ७ व १६ या मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेले नवीन सिमेन्ट कांक्रेटरोड आणी सिमेन्ट नाली बांधकामाचे भुमीपूजन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते सोमवार (ता.०१ आगस्ट) रोजी पार पडले.
या प्रसंगी तालुका कांग्रेस चे अध्यक्ष संदिप भाटिया,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती आफताब शेख (अन्नूभाई),नगरसेवक तथा गटनेते सरबजीतसिंग भाटिया (शैंकी),नगरसेवक मोहन डोंगरे, नितीन मेश्राम, पंकज शहारे, स्वीक्रुत नगरसेवक शकील कुरैशी,नगरसेवीका सुनीताताई शाहू, कमलताई मेश्राम, पिंकी कटकवार, मुख्याधिकारी अजय पाटणकर, बांधकाम अभियंता श्रीझामरे, जिल्हा कांग्रेस चे महासचिव बळीराम कोटवार,युवक कांग्रेसचे शहराध्यक्ष कुलदिप गुप्ता, अमीत तरजुले, कांग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता परमजीतसिंग भाटिया,छगनलाल मुंगणकर,जैपाल प्रधान,नरेश राउत,अणवंताताई आचले, मिणाताई राउत,छायाताई मडावी, मनिषाताई डुंबरे यांच्यासह दोन्ही वार्डातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

Share