९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस असल्यामुळे शासकीय सुट्टी जाहीर करा : सविता पुराम
◼️सविता पुराम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
देवरी 01: गोंदिया जिल्हा आदिवासी समुदायाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ९ ऑगस्ट २०२२ रोजी जागतीक आदिवासी दिवस आहे. आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, त्याचा जल, जंगल व जमीनीवरील अधिकार अबाधित राहावा त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, अस्तीत्व, आत्मसम्मान, अस्मिता राहावी या साठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
हा दिवस आदिवासीचा आत्मसन्मान जपणान्या आणि अस्मिता फुलविणाऱ्या या जागतिक आदिवासी दिना निमित्याने दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस जगभरातली आदिवासी बांधव जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात. संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) ने हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केल्यामुळे या दिवसाचे महत्व अनन्य साधारण असे आहे.
गोंदिया जिल्हा हा सुध्दा आदिवासी बहुल जिल्हा आहे. आणि हा दिवस त्यांचेकरिता महत्त्वाचा असून तो दिवस साजरा करण्याकरिता शासकीय सुट्टी असली पाहीजे जेणे करुन विदयार्थी व कर्मचारी सुध्दा हा दिवस साजरा करु शकतील दरवर्षी ९ ऑगस्ट या दिवशी जागतिक आदिवासी दिनानिमित्य शासकिय सुट्टी असावी या करिता मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २९/७/२०२२ रोजी घेण्यात आलेली सर्वसाधारण सभे मध्ये ठराव घेण्यात आलेला आहे. करिता जागतिक आदिवासी दिनानिमीत्य दरवर्षी ९ ऑगस्ट ला शासकीय सुट्टी जाहीर व्हावी म्हणून जिप गोंदियाचे महिला व बाल कल्याण सभापती सविता पुराम यांनी जिल्हाधीकारी गोंदिया यांना निवेदनातून मागणी केली आहे.