राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना असभ्य बोलणाऱ्या खासदार अधिरंजन चौधरी यांच्यावर कडक शिक्षा करा: भाजप देवरी

◼️नगराध्यक्ष संजू उईके यांच्या सह भाजपनगरसेवकांचे तहसीलदारमार्फ़त निवेदन

देवरी ०१: एक आदिवासी समाजाची महिला आज भारत देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. खरा मान आदिवासी समाजाला मिळाला आहे. याचा सर्वाना अभिमान आहे.

आदिवासी हे देशाचे मुळ निवासी असून आज पर्यंत कोणताही सर्वोच्च स्थान या देशाच्या आदिवासीला मिळालेला नव्हता. आता द्रोपदी मुर्मू भारताच्या सर्वोच्च पदावर म्हणजे महामहिम् राष्ट्रपती झाल्या परंतु हा पद भारतीय जनता पक्षाने गरीब कुटूंबातील एका आदिवासी महिलेला दिले. हे त्यांच्या पोटात दुखू लागले म्हणून त्याने कटपुतली आहे असा हिन शब्दात त्यांचाच नव्हे तर आदिवासी समाजाचा तिरस्कार करण्याचे काम केले आहे. ते तेवढ्यावरच थांबले नाही. तर आता आदिवासी समाजाचे आरक्षण संपून जाईल असे सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा काम करीत आहेत. संसदमध्ये काँग्रेसचा नेता अधिरंजन चौधरी या खासदाराने चक्क आपल्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूजी यांना राष्ट्रपत्नी म्हणून त्यांनी या देशाचाच नव्हे तर या देशातील सर्व नागरीकांचा, या देशातील सर्व महिलांचा, या देशातील सर्व आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. अशा या अधिरंजन चौधरीला देशाचे सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या राष्ट्रपती याचा अपमान केला म्हणून यांना कडक शिक्षा व्हावी. यासाठी भाजपच्या वतीने निवेदनातून मागणी केली आहे.

यावेळी भाजपचे माजी आमदार संजय पुराम , अनिल येरणे , प्रमोद संगीडवार प्रवीण दहिकर , यादोराव पंचमवार , नगराध्यक्ष संजू उईके , उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार , सभापती संजय दरवडे , नूतन कोवे , पिंकी कटकवार , तनुजा भेलावे , कौशल्याकुंभरे, कमलमेश्राम आदि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share