“बेबी केअर किट” चे वापर करून मातांनी बालकांची काळजी घ्यावी : महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम
◼️ बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वर्पे आणि देवरीच्या नगरसेविकांची उपस्थिती
प्रहार टाईम्स @डॉ. सुजित टेटे
देवरी 27: महाराष्ट्र शासनाच्या बेबी केअर कीट योजनेच्यावतीने देवरी येथील अंगणवाडी -5 मध्ये बाळाला दैनंदिन लागणाऱ्या २ हजार रुपये किमतीचे “बेबी केअर किट” चे वाटप करण्यात आले.
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी बेबी केअर कीट चे वाटप करण्यात येते. यामध्ये नवजात बालकाचे कपडे, टॉवेल, मच्छरदाणी अंगाला लावायला तेल, ब्लँकेट, प्लास्टिक चटई, शाम्पू, नेलकटर, खेळणी, हातमोजे, पायमोजे, आईसाठी हात धुण्यासाठी लिक्विड, बॉडी वॉश लिक्विड, झोपण्याची लहान गादी इ. प्रकारचे साहित्य व सर्व साहित्य ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी लहान बॅग देण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिप गोंदियाचे महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम , देवरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी संतोष वर्पे , नगरसेविका तनुजा भेलावे , प्रज्ञा संगीडवार ,नूतन सयाम, कौशल्य कुंभरे, सौ. मेश्राम, सरपंच भेंडारकर , अंगणवाडी सेविका बरखा लाडे, योगेश्वरी शेंडे, कुमोदिनी येनप्रेडीवार, किरन मेश्राम, शामा मडावी, वर्षा कावळे, रेवनकला टेकाम, कमल मेश्राम, सरिता रहिले, रेखा यावलकर, नंदिनी बारसागडे, यांच्या सह आशा सेविका, स्तनदा माता , गरोदर माता उपस्थित होते.