जिल्हा परिषद शाळा चिल्हाटी येथील 2 एल.इ.डी. टीव्ही चोरटयांनी पळविले
◼️जिप शाळेतील टीव्ही संच चोरांच्या रडारवर
देवरी 27: “यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी” शाळांच्या दर्शनीभागावर लिहलेली संदेश सर्वांच्या परिचयाचे आहे. ज्ञानाचे गंगा दोरोदारी पोहचवणाऱ्या जिप शाळा आता असुरक्षित असल्याचे चित्र आहे. ज्ञानदान करून सुजाण नागरिक घडविणाऱ्या शाळेतच चोरटयांनी हात साफ केला असून 2 टीव्ही संच पडविल्याची घटना घडली आहे. चिचगड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिल्हाटी(ककोडी) येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचा अज्ञात चोरांनी कुलूप कापुण दोन एलईडी टीव्ही संच चोरुन नेल्याची घटना आज सकाळी 9:30 ला उघडकीस आली.चोरट्यांनी आरीच्या साहाय्याने कुलूप कापल्याचे निदर्शनास आले आहे. प्रयोग शाळेच्या रुममध्ये लावलेले दोन 32 इंच L E D, टि.व्ही.सचं चोरून नेल्याचे शाळेत आलेल्या विद्यार्थाना समजले.त्यानी तत्काळ शिक्षकांना आणि गावकर्याना माहिती दिली.शिक्षक शाळेत पोहोचल्यानंतर लगेज पोलिस पाटील व गावकर्यासोबत शाळेची पाहणी केली असता कार्यालयाचे कुलूप अर्धवट कापलेला आढळला.चोरीची तक्रार शाळेच्या मुख्याधापिका किरण सलामे, सहा.शिक्षक चौरागडे यांनी पोलिस स्टेशन चिचगड़ येथे दिली. गेल्या काही महिन्यापासून ककोडी परिसरात चोरीच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. व्यापारी , दुकानदार आता शाळासुद्धा चोरांच्या रडारवर आल्या आहेत.