पुनर्वसू नक्षत्रात नदी,नाले झाले ‘ओव्हरफ्लो’, 60 टक्क्याहून अधिक भात रोवणी पूर्ण

आतापर्यंत 57.2 मिमी पाऊस: जिल्ह्यात आतापर्यंत 57.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज, 25 जुलै रोजी गोंदिया तालुक्यात 15.7 मिमी, आमगाव 24.1, तिरोडा 15.7, गोरेगाव 5.6, सालेकसा 15.5, देवरी 13.1, अर्जुनी मोर 6.3 व सडक अर्जुनी तालुक्यात 4.4 मिमी अशी एकूण 12.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

देवरी 27: दोन आठवड्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी क्षणाक्षणात पाऊस कधी रिमझाी तर कधी सरींवर सरी बरसत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसू नक्षत्रातील रिमझीम पाऊस व उन्हं अशी प्रतिमा काही अंशी पुसली गेली. मृग, आद्राच्या पावसाला पुनर्वसूने साथ दिल्याने जिल्ह्यातील नदी, तलाव, बोड्या, नाले आदी ओसंडून वाहत आहेत. पूनर्वसू हा पावसाचा तिसरा नक्षत्र होय. खरीप हंगामातल्या धानपीकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा नक्षत्र मानला जातो. मृग नक्षत्र पेरणीचा असतो.

आर्द्रा नक्षत्रात धान रोवणीची कामे सुरु होतात. तर आर्द्रा नक्षत्रातच सुरु झालेली रोवणी पूर्णत्वाला नेण्यात पूनर्वसू नक्षत्राची महत्वाची भूमिका असते. पूनर्वसू नक्षत्रात थांबून-थांबून येणारा पाऊस व ऊन्हं पडते. असा पूनर्वसचा इतिहास आहे. गेल्या वर्षी पूनर्वसूच्या दोनचार सरी बरसल्या होत्या. मात्र यंदा पूनर्वसूचे पहिले तीन दिवस कोरडे गेल्याने मागील वर्षाप्रमाणेच हे नक्षत्र धोका देणार की काय अशी शंका उपस्थित होण्यापूर्वीच नक्षत्राच्या चौथ्या दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु झाला. यंदाच्या पूनर्वसू नक्षत्रात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाले, तलाव, शेतशिवार ओव्हरफ्लो झाले आहेत.

जिल्हातील 60 टक्क्याहून अधिक रोवणी पूर्ण:

दररोज पाऊस येत असल्याने आर्द्राच्या अखेरीस सुरु झालेल्या रोवणीला वेग आला आहे. ज्यांची पर्‍हे रोवणी झाली त्या शेतांमध्ये रोवणी पूर्ण करण्याची घाई होत आहे. नियमीत पाऊस होत असल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 60 टक्के रोवणीची कामे झाले आहेत.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा:

जिल्ह्यात नियमीत पाऊस सुरु असल्याने नदीनाले ओसंडून वाहत आहे. त्यातच आज, 25 जुलैपासून मध्यप्रदेशातील संजय सरोवरमधून 142 क्युसेक गतीने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे. पुजारीटोला धरणातुही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी जिल्ह्यातून वाहणार्‍या वाघ नदीला मिळत असल्याने वाघ नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे.

Print Friendly, PDF & Email
Share