भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेमध्ये गांव समाविष्ट करा: सविता पुराम

◼️अप्पर आदिवासी आयुक्त, विभागीय अप्पर आदिवासी कार्यालय, नागपुर यांना सविता पुराम सभापती महिला व बालकल्याण समिती यांचे निवेदन सादर

देवरी 27: अनुसुचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना एकवेळी चौरस आहार देण्यासाठी ” भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना” सुरु करण्यात आली आहे. तसेच ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना अंडी /केळी/ ऋतुमानानुसार फळे इत्यांदिचा आहार देण्यासाठी शासनाच्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

गोंदिया जिल्हया अंतर्गत सालेकसा, देवरी व सडक/अर्जुनी या आदिवासी व अनुसुचित बहुल तालुक्याअंतर्गत सुध्द राबविली जाते परंतु या तालुक्यातील काही गावे वगळण्यात आलेली आहेत. वगळण्यात आलेल्या गावात सुध्दा योजनेचे लाभ तेथिल जनते पर्यत पोहचवणे आवश्यक आहे जेणे करुन तेथील बालकांची शारीरीक व मानसिक विकास होऊन ते सुदृढ होतील व त्या गावात कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होणार नाही.

शासन निर्णय क्र. अविवि-२०१५/प्र.क्र७८/का-८, दिनांक १८ / ११ /२०१५ आणि अविवि-२०१६/प्र.क्र८३/का-८, दिनांक ५/८/२०१६ अन्वये आदिवासी व अनुसुचित क्षेत्रा करिता राबविण्यात येत असून वगळलेल्या गावाचा यामध्ये समावेश करावा यासाठी अप्पर आदिवासी आयुक्त, विभागीय अप्पर आदिवासी कार्यालय, नागपुर यांना सविता पुराम सभापती महिला व बालकल्याण समिती यांचे निवेदन सादर केले आहे.

Share