समर्थ महाविद्यालयात वाचन दिन साजरा
स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालय चळवळीचे प्रणेते स्व पी. एन. पनिकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वाचन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वाचन कक्षात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे आणि प्रमुख वक्ता म्हणून प्रा. डॉ. धनंजय गभने होते. स्व. पणिकर यांच्या प्रतिमेला हार चढवून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गभणे यांनी केले. ग्रंथालय ,ग्रंथाचे महत्व या विषयी थोडक्यात माहिती या प्रसंगी डॉ. गभणें यांनी दिली . डॉ. कापसे यांनी विद्यार्थ्याना वाचन , त्याचे महत्त्व आपल्या अध्यक्षीय भाषणात पटवून दिले वाचाल तर वाचाल हे ब्रीद विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजे असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले.
या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांना प्रत्येकी एक ग्रंथ वाचनासाठी देण्यात आला. सुमारे २० मिनिटे प्रत्येकानी वाचन कक्षात बसून ग्रंथाचे वाचन केले. नंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. या नंतर कार्यक्रमची सांगता झाली. सदर कार्यक्रम हा एक अभिनव उपक्रम ठरला हे विशेष.