इथुन दुर जाताना
✍️ सुदर्शन एम. लांडेकर देवरी 9420191985
इथुन दुर जाताना माझी आठवण तुमची असेल
तुमची आठवण माझी असेल
या साऱ्या आठवनिचाच मनात उद्या गाव बसेल.
इथुन दुर जाताना कालच जगण दाहक वाटलं
आजच जगण नाहक वाटत
तरीही उद्याच जगन का मोहक वाटत.
इथून दुर जागना तुम्ही मला खुप दिल
देईन म्हणता म्हणता मि तुम्हाला काय दिल
इथुन दुर जाताना मागे वळुन पाहिल तेव्हा
आसवाच्या पटलातून आठवणही हसली
आसवांकडे वळलो तेव्हा आसव बिचारी मुसमुसली.
इथुन दुर जाताना मि फक्त शब्दच मागेन
प्रेमाचे असतील तरी प्रेमाचे नशतील तरी
त्या शब्दांवरच जगेन.
इथुन दुर जाताना देण्यासारखं माझ्याजवळ शब्दाशिवाय तरी काय आहे, आठवणीचे शब्द हे जणु दुधावरची साय आहे.
इथुन दुर जाताना खुप काही दाटुन येत आठवणीच्या प्रवाहात मन बर्फसारख गोथून जात.
“इथुन दुर जाताना आज पापण्या पाणावतात पापण्या पाण्यावल्यावरच खर तर आतल्या वेदना जाणवणात
इथुन दुर जागना आपण आपले राहु काय आपापले झाल्यावर मग मागे वळुन तरी पाहु काय.
इथुन दुर जाताना माझ्या आठवणी खरोखरचं तुमच्या काळजाला भिडतील काय माझ्या आठवणीत खरोखरच तुमचे डोळे रडतील काय.
इथुन दुर जाताना कळत नकळत चुकलो जरी खुप काही शिकलो आहे तुमच ऋण कस फेडू या ओझ्यात वाकलो आहे.
इथुन दुर जाताना माझ्यावर कुणी रुसु नका ओघळणा-या आसवांना रुमालाने पुसु नका.
इथुन दुर जाताना मला उद्याची चाहुल आहे. कालच्या आठवणीत मात्र अडलेल पाऊल आहे.
इथुन दुर जाताना अनेक वाटा माझ्या असतील पावला पावलावर मात्र तुमच्या आठवणी ताज्या असतील.
इथुन दुर जाताना आठवणीच्या प्रदेशात एक पाखरु भिरभिरतय प्रत्येक झाड निशब्द अन एक पाखरू हुरहुरतय
इथून दूर जाताना मनात माझ्या वादळ अडलेलं
इथल्या साऱ्या आठवणीचच उभ रान पेटलेल.
इथुन दुर जाताना माझ्या साऱ्या आठवणी तुमच्या मनात उरतील काय
तुमच्या आठवणी मला जगण्यासाठी पुरतील काय.
इथुन दुर जाताना, मि आज खरोखरंच रडतोय
पण तुम्हा सगळ्यांना बघुन मात्र नाटक करतोय.
इथून दूर जाताना, इथुन दुर जाताना