नवाटोला येथे व्यायाम शाळेचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते उद्घाटन

प्रहार टाईम्स
देवरी : तालुक्यातील ग्रामपंचायत भर्रेगांव येथील नवाटोला गावासाठी इमारत व व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून उद्घाटन काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते नुकतेच झाले.
यावेळी भर्रेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच लखनलाल पंधरे, पंचायत समितीचे सदस्य प्रल्हाद सलामे, ग्रामपंचायत सदस्य योगराज साखरे, ग्रा पं सदस्य नंदलाल नेताम, ग्रामसेवक सी आर चाचेरे, मुख्याध्यापक उईके सर,अंगणवाडी सेविका सरिता रहिले, दिलीप बडोले, रंजीत पडोटी,बबलू उईके,भारत मिरी,नवलसिंग मडावी, कैलास सलामे, विजय मेश्राम, निलेश मडावी, सोहम उईके,प्रमोद मडावी, अजय सलामे, परसराम बागतलवार, ललिता बैस व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार सहषसराम कोरोटे यांनी जिल्हा परिषद शाळेला तसेच अंगणवाडी येथे भेट घेऊन शाळेचे मुख्याध्यापक उईके यांना शाळेमध्ये जास्तीत जास्त मुलांची संख्या वाढवावी व मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण द्यावे असे ते यावेळी बोलले.

Print Friendly, PDF & Email
Share