देवरी तालुक्यातील निसर्गरम्य ढासगडमध्ये वाढली पर्यटकांची संख्या

देवरी 25: तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळख असलेल्या ढासगड येथे सध्या पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आह़े. सध्या तालुक्यात पाऊस व ढगाळ हवामान असल्याने ढासगड येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना आकर्षित करीत आह़े. जिल्ह्यातील व राज्यातील विविध ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी हजेरी लावत आहेत.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे वीकेंडला पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येते रविवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांची रेलचेल असते. जुलै, ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडत असल्याने येथील निसर्ग अधिक खुलून दिसतो. येथील डोंगरदऱ्यांनी जणू काही अंगावर हिरवा शालू परिधान केला असल्याचा भास होतो. विशेषत: ढासगड येथे शंकराचे मंदिर, मोठे त्रिशुल, श्रीकृष्णाचे मंदिर, त्यात पहाडीवरुन पाण्याचा वाहणारा प्रवाह, वाघाची गुफा, लहान मुलांसाठी उद्यान त्यामुळे केवळ तालुक्यातीलच नव्हेत तर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक येथे हजेरी लावतात.

उंचावरील भाग असल्याने या ठिकाणी पावसाचे प्रमाणही सर्वाधिक असते सध्या ढगाळ हवामान तसेच तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येतो त्यामुळे हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात पर्यटकांचा या ठिकाणी येण्याचा ओघ अधिक आहे.

Print Friendly, PDF & Email
Share