कोरोना काळातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान पालकाच्या सहकार्यातून भरून काढू : प्रा.डॉ. सुजित टेटे

◼️ब्लॉसम पब्लिक स्कुल देवरी येथे पालक शिक्षक चर्चासत्र संपन्न

देवरी 25: कोरोनाचे प्रभाव कमी होताच दोन वर्षानंतर शाळा सुरु झाल्या असून नवीन शैक्षणिक सत्राला उत्साहाने सुरुवात झाली. विद्यार्थी शाळेत येताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले पण दोन वर्षाच्या शैक्षणिक खंडामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उदासीनता निर्माण झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. शिक्षक पालक यांच्यासमोर आव्हाने उभी झाली असून यावर उपाय म्हणजे शिक्षक पालक मिळून सहकार्याने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करणे. याविषयावर देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये चर्चा सत्र संपन्न झाले असून शाळेचे प्राचार्य यांनी कोरोना काळातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान पालकाच्या सहकार्यातून भरून काढू असे मत व्यक्त केले.

नर्सरी ते इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना या चर्चा सत्रात आमंत्रित करण्यात आले होते. टप्प्या टप्प्याने झालेल्या या सत्रामध्ये पालकांनी आपल्या समस्या शिक्षकांसमोर मांडल्या, त्यावर काय उपाय करता येणार या विषयी शिक्षक पालकांची चर्चा झाली असुन पालकांच्या आणि शिक्षणाच्या सहकार्यातून सुयोग्य मार्ग करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानाला भरून काढले जाणार आहे.

सदर चर्चा सत्रात शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे , शिक्षक विश्वप्रित निकोडे , राहुल मोहुर्ले , भोजराज तुरकर , नलू टेम्भारें , योगिता कोसरकर , चंद्रकांत बागडे , मनीषा काशिवार , कलावती ठाकरे , तनुजा भेलावे आदी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share