देवरीच्या न्यू सिता पब्लिक स्कूल चे सुयश

■ सी.बी.एस.ई.च्या परिक्षेत शाळेचा १००% टक्के निकाल

देवरी, ता.२५: देवरी तालुक्यातील.एकमेव सी.बी.एस.ई. संलग्न असलेली न्यू सिता पब्लिक स्कूल देवरी च्या विद्यार्थ्यांनी सी.बी.एस.ई. बोर्डाचे वर्ग १० वी च्या परिक्षेत अपेक्षीत यश संपादन केले असून या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या शाळेतील कु.तनुश्री कुंभरे हिने ८९.०२% टक्के गुण घेवून प्रथम क्रमांक तर कु. वैष्णवी फुंडे हिने ८७.०८℅ गुण मिळवून द्वितीय क्रमांक तसेच तन्मय रामटेके यांनी ८६% टक्के गुण घेवून त्रुतीय क्रमांक , आयुश देशपांडे यांनी ८५% टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक तर कु. वैष्णवी सयाम हिने ८४% टक्के गुण घेवून पाचवा क्रमांक मिळवीला आहे.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे न्यू सिता पब्लिक स्कूल शाळा संस्थेचे अध्यक्ष अनिल अग्रवाल,उपाध्यक्ष अंकित अग्रवाल, शाळेचे प्राचार्य अशोक उईके,काँर्डिनेटर दिलप्रितकौर भाटिया यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share