गोंदिया येथे जिल्हाधिकारी यांच्याशी आमदार कोरोटे यांची विविध विषयावर चर्चा

देवरी,ता.२५ : गोंदिया येथे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आमगावं देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी जिल्हाधिकारी नयना मुंडे यांना गुरूवार (ता.२१ जुलै) रोजी भेटून विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांच्या विषयांवर चर्चा केली.
या चर्चेत सी.एफ.आर. अंतर्गत तेंदूपान संकलन,चुमली नदी वरील पुलीया व रस्ते,एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत अनेक विकास कामे आणि देवरी आमगांव हायवे मार्गाची दुरूस्ती अशा विविध सयस्यांच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी नयना मुंडे यांच्यासह उपजिल्हाधिकारी बेलपत्रे मँडम, पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, उपवन संरक्षक कुलराजसिंग, जिल्हा नियोजन अधिकारी नखले मँडम, व इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें