देवरी- आमगाव महामार्ग भोगतोय नरक यातना! दोन वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी चालला खेळ

◼️राष्ट्रीय महामार्गावर वडेगाव येथील अपूर्ण रस्ता बांधकाम ठरला नागरिकांसाठी जिवघेणा

देवरी 25: देशात अनेक ठिकाणी सध्या मोठ्या संख्येने नवीन राष्ट्रीय महामार्गा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.त्याच धर्तीवर गोंदिया जिल्हा मधून राष्ट्रीय महामार्ग 543 चे काम गेल्या 3 वर्षापासून सुरू करण्यात आले आहे.आमगाव ते देवरी या महामार्गावर अनेक ठिकाणी जंगल व्याप्त परिसर येत असल्याने अनेक ठिकाणी बांधकाम अपूर्ण आहे.याचा नाहक त्रास नागरिकांना करावा लागत आहे.

देवरी तालुक्यात वडेगाव येथील महामार्ग बांधकाम अपूर्ण असल्याने परिसरातील नागरिक,विध्यार्थी,आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास असून अनेकांनी आपला जीव सुद्धा गमावला तरी या कळे कुणीही लक्ष न दिल्याने आता मात्र गावातील नागरिकांच्या मनात या विरुद्ध आक्रोश निर्माण झाला असून आता रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.जर रस्ता बनवायचा नव्हता तर खोदकाम करण्याची गरज का ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 543 चे सध्या गोंदिया जिल्ह्यात जोमात काम सुरू आहे.मात्र गेल्या 3 वर्षापासून आमगाव ते देवरी महामार्गाचे काम सुरू असून या मार्गावर अनेक ठिकाणी वनविभागाची परवानगी आवश्यक असताना सुद्धा याकळे संबधित कंपनीने दुर्लक्ष करीत त्याभागात खोदकाम केले.मात्र आजही त्या रस्त्याची कोणत्याची प्रकारची दुरुस्ती केली नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

गावकऱ्यांच्या या महामार्गावर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात आली नाहीतर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सोबत बांधकाम कंपनी कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Print Friendly, PDF & Email
Share