सीईओ आणि डि.एच ओ. साहेब आपल्या अधिकाऱ्यांना प्रोटोकालने वागण्याचे प्रशिक्षण दया

■ ककोडी क्षेत्रातील जि.प.सदस्य उषाताई शहारे यांची मागणी

देवरी, ता.२४: जि.प. गोंदिया अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील आरोग्य विभाग, शैक्षणिक विभाग सह इतर विभागातील सर्व अधिकाऱ्यांना आपआपल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधि सोबत प्रोटोकॉलने वागत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना जि.प.गोंदिया तर्फे लोकप्रतिनिधि सोबत प्रोटोकॉलने वागत नसतील तर त्यांना प्रोटोकाँल ने वागण्याचे प्रशिक्षण दया अशी मागणी ककोडी क्षेत्राचे जि.प.सदस्य उषाताई शहारे यांनी प्रसिद्धि पत्रकातुन केली आहे.
प्रसिद्धि पत्रकात उषाताई शहारे यांनी म्हटले आहे की, प्रत्येक जि.प.सदस्य हा १५ ते २० हजार लोकसंख्येतुन निवडून येतो. त्याच्यावर आपल्या क्षेत्रातील आरोग्य व शिक्षण विभागासह इतर क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी असते. जेवढी जबाबदारी ही निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची असते तेवढीच जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची असते. परंतु आरोग्य विभागातील अधिकारी हे आपल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधि सोबत प्रोटोकॉल ने वागत नसून त्यांच्या मनात लोकप्रतिनिधि विषयी कोणताही आदर नाही.
जि.प.च्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या समितीच्या अध्यक्ष हा त्या क्षेत्राचा जि.प.सदस्य असतो. परंतु प्राथमिक आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ककोडी आरोग्य केंद्रात अजबच प्रकार झाला डॉ. सौ. रामटेकर यांनी आरोग्य केंद्राच्या अध्यक्ष यांनाच नोटीस पाठुन विचारणा केली . समितीच्या अध्यक्षसोबत प्रोटोकॉल ने वागण्याचे नियम पाळण्याची माहीती नसेल तर कोणताही लोकप्रतिनिधि हा प्रकार सहन करणार नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधिची भावना ही आपल्या मान सम्मान विषयी जुळलेली असते. जि.प.सदस्यांना आपल्या क्षेत्रात आरोग्य व शैक्षणिक विभागासह इतर क्षेत्रात विकासकामे करायचे असतात जर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधि सोबत वागन्याची सभ्यता नसेल तर इतर लोकांसोबत कसे वागत असतील हा एक प्रश्न उद्भवतो.
अशा अधिकाऱ्यांची वारंवार होत असलेल्या चुकाच्या संदर्भात जि.प.चे जिल्हाआरोग्य अधिकारी यांच्या लक्षात आणून दिल्यावर सुद्धा ते या विषयी गंभीर नाही. या विषयी संबंधित अधिकाऱ्यावर कशल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही जर वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यास दुर्लक्ष करीत असतील तर सीईओ आणि डि.एच.ओ.साहेब आपले ग्रामीण भागातील अधीकारी हे लोकप्रतिनिधि सोबत प्रोटोकॉलने कसे वागावे याबद्दल त्यांना प्रोटोकाँलने वागण्याचे प्रशिक्षण दया अशी मागणी ककोडी क्षेत्राचे जि.प.सदस्य उषाताई शहारे यांनी प्रसिद्धि पत्रकातुन केली आहे.

Share