गोंदियात पासपोर्ट कार्यालय सुरु होणार

गोंदिया: जिल्ह्यातील बहुप्रतीक्षेत पासपोर्ट कार्यालय सुरू न झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दूर अंतरावरील नागपूर येथील कार्यालयात धाव घ्यावी लागते परिणामी नागरिकांना शरीरिक मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड वस्तू नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यासाठी मंजूर झालेला पासपोर्ट कार्यालय तात्काळ सुरू करून जिल्हा वाशियांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार सुनील मेंढे आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मुरलीधरण यांना दिल्ली येथे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

गोंदिया शहर व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. येथे रेल्वे स्टेशन असून जवळपास सर्वच गाड्यांचे थांबे आहेत. शहराच्या काही अंतरावर मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्य आहेत. गोंदिया जवळील बिरसी हवाई अड्ड्यावरून प्रवासी विमान सेवा सुरू झाली आहे. जिल्ह्यासह सीमावरती राज्यातून अनेक नागरिक, विद्यार्थी इतर देशात व्यवसाय, नोकरी, शिक्षणासाठी जातात. मात्र शहरात पासपोर्ट कार्यालय नसल्याने त्यांना दीड-दोनशे किमी अंतरावरील नागपूर कार्यालय गाठावे लागते. यात वेळ पैसासह शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांचा त्रास कमी व्हावा व जिल्ह्यातील नागरिकांना सुविधा व्हावी या हेतूने मंजूर झालेला पासपोर्ट कार्यालय तात्काळ सुरू करावा, Passport Office vअशी मागणी खा. मेंढे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री मुरलीधरण यांची दिल्लीत भेट घेत निवेदन देऊन केली आहे. यावेळी मुरलीधरन यांनी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांशी चर्चा करून गोंदिया येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याचे निर्णय दिले असून लवकरच जिल्हावासीयांची पासपोर्ट कार्यालयाची प्रतीक्षा संपणार असल्याची आशा खा. मेंढे यांनी व्यक्त केली.

Print Friendly, PDF & Email
Share