भारताचे महामहिम राष्ट्रपती पदावर ‘द्रौपदी मुर्मू’ यांची निवड होताच भाजपचे विजय जल्लोष
प्रहार टाईम्स
देवरी 22: भारताचे महामहिम राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांची निवड होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवरी येथे विजय जल्लोष साजरा केला. भारतीय जनता पार्टी देवरी मंडळाच्या वतीने महाराणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आतिषबाजी करीत आनंदोजल्लोष साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाला भारतामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपतीपदी सार्वभौम मताधिक्याने निवडून दिले याबद्दल आभार मानण्यात आले. सदर कार्यक्रमाला भंडारा गोंदियाचे संघटन महामंत्री व संपर्कप्रमुख वीरेंद्र जी अंजनकर , भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव व माजी आमदार संजय पुराम , तालुकाध्यक्ष अनिल येरणे , प्रमोद संगीडवार, महेश जैन , यादवराव पंचमवार, नगरपंचायत देवरीचे नगराध्यक्ष संजू भाऊ उईके , उपाध्यक्ष प्रज्ञा संगीडवार , नगरसेवक सभापती रितेश अग्रवाल , नगरपंचायत देवरी सभापती संजय दरवडे , पंचायत समितीच्या सभापती अंबिका बंजार, देवकी मरई तालुकाध्यक्ष भाजपा महिला आघाडी, नूतन सयाम नगरसेविका , कौशल् कुंभरे माजी नगराध्यक्ष व नगरसेविका नगरपंचायत देवरी , युवा मोर्चाचे अध्यक्ष इंद्रजीत सिंग भाटिया, युवा मोर्चाचे महामंत्री नितेश कुमार वालोदे , विद्यार्थ्या आघाडीचे अध्यक्ष दिशांत चन्ने , अल्पसंख्याक आघाडीचे इम्रान खान , राष्ट्रपाल राऊत भाजपा गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा राजु शाहू व इतर सर्वकार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहून आनंद उत्सव कार्यक्रम साजरा केला.