उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सविता बेदरकर यांना सामाजिक उपक्रमाकरिता 15 हजार रोख रक्कम

गोंदिया 22: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील अनाथांची माय सविताताई बेदरकर यांना सामाजिक उपक्रमाकरिता रुपये 15 हजार रोख रक्कम देण्यात आली. तसेच त्या जे समाजकार्य करीत आहेत त्याकरिता त्यांचा सर्व सभापतींनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार केला.

यावेळी जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष पंकज खोमेश्वर रहांगडाले, संजय टेंभरे, सभापती- अर्थ व बांधकाम समिती, सविता संजय पुराम, सभापती-महिला व बालकल्याण समिती, रुपेश कुथे, सभापती- कृषी व पशुसंवर्धन समिती तसेच जिल्हा परिषद गोंदिया सन्माननीय सदस्य रजनी कुंभरे, माधुरी रहांगडाले, कविता रंगारी, शैलेंद्र नंदेश्वर, प्रवीण पटले, प्रीती ताई कतलाम, तुमेश्वरी बघेले, मनोज बोपचे, नितेश वालोदे आदी उपस्थित होते.

Share