महिला सरपंचाला गैरप्रकार भोवला

Gondia: तालुक्यातील ईर्री येथील महिला सरपंचाने 3 लाख 21 हजार 429 रुपयांची अफरातफर केल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना विभागीय आयुक्तांनी सरपंचपदावरून अपात्र घोषित केले. गोंदिया तालुक्यातील इर्री येथील सरपंच दुर्गा लखन मेंढे यांनी शासकीय निधीची अफरातफर केल्याचा आरोप उपसरपंच रवी तरोणे यांच्यासह सात ग‘ापं सदस्यांनी जिपचे मु‘य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. तक‘ारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल वरिष्ठांकडे सोपविला. त्याआधारे अप्पर आयुक्त यांनी 11 जुलै रोजी सरपंच दुर्गा मेंढे यांना अपात्र घोषित केले. 2020-21 या आर्थिक वर्षात विविध योजनांच्या कामात साहित्य पुरवठ्यात अनियमितता केली होती. ग‘ामसेवक ललीत सोनवाने आणि सरपंच दुर्गा मेंढे यांनी शासकीय निधीची अफरातफर केल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेशही देण्यात आले. सरपंचपदाचा कार्यभार उपसरपंच रवी तरोणे यांच्याकडे सोपविण्यासंदर्भातील आदेश गटविकास अधिकारी राजकुमार पुराम यांनी दिले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share