रोटरी क्लबच्यावतीने देवरी तालुक्यात “प्लास्टिक बंदी” या जागतिक अभियानाला सुरुवात
■ महाविद्यालय, विद्यालय व आश्रम शाळेला भेट देऊन कापडी पिशवीचे वितरण आणि वृक्षारोपण
देवरी २२: रोटरी क्लब ऑफ नागपूर पश्चिम च्या वतीने या वर्षी ” से नो टू प्लास्टिक” ( प्लॅस्टिकला नाही म्हणा) हे प्लास्टिक बंदी चे जनजाग्रुती अभियान राबवित आहे. या निमित्त देवरी तालुक्यातील विद्यार्थी , शिक्षक व पालक वर्गात प्लास्टिक विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि या अभियानास गती, अधिक प्रचार व प्रसार करण्यासाठी रोटरी क्लब नागपूर पश्चिम चे सदस्य (रोटरीयन) तथा जागतीक पर्यावरण रत्न, रक्षक आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जगदीश बारसागडे यांनी देवरी तालुक्यातील एम.बी.पटेल महाविद्यालय, ब्लॉसम पब्लिक स्कुल, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कुल, शासकीय आश्रम शाळा यांना मंगळवार रोजी भेट देऊन शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम या विषयी मार्गदर्शन करून लोकांच्या उपयोगाकरीता कापडी पिशव्याचे वाटप केले.
या प्रसंगी त्यांच्या सोबत पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा पर्यावरण मित्र जगदीश तिवारी, पर्यावरण मित्र आनंद नळपते, यांच्या सह देवरी येथे एम.बी.पटेल महाविद्यालयात प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे, ब्लॉसम पब्लिक स्कुल प्राचार्य डॉ.सुजित टेटे, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कुल( सी.बी.एस.ई) बोरगाव/बाजार येथे प्राचार्य सी.ए. शहारे आणि शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोरगाव/बाजार येथे प्राचार्य नरेंद्र भाकरे तसेच शाळेतील इतर शिक्षक व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्लास्टिकला नाही म्हणा या अभियाना विषयी माहिती देऊन मार्गदर्शन करतांनी डॉ. जगदीश बारसागडे म्हणाले की, या प्लास्टिक मुळे पर्यावरणाच्या ऱ्हास व मानवी जीवनावर होणारे परिणामास आळा बसावा. या विषयी विस्तृत माहिती देऊन प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशव्या वापर करावा म्हणून उपस्थितांना कापडी पिशव्या चे वाटप केले.
प्लास्टिक बंदी अभियान हा उपक्रम यशस्वी व शासन अपेक्षारंती माध्यमांमधून त्यांना त्यांचे लाभलेल्या विशेष योगदानास्तव संबंधित महाविद्यालय/कनिष्ठ महाविद्यालय व शाळा यांना रोटरी क्लब ऑफ नागपूर पश्चिम द्वारे सत्कार व सन्मान देऊन अप्रिशिएशन प्रमाणपत्र देण्यात येईल असे क्लब च्या वतीने प्रांतापाल गजानन रानडे, सेक्रेटरी(प्रशासन) ऋषिकेश गुप्ते व सेक्रेटरी (प्रोजेक्ट) पंकज गडकरी यांनी कळविले आहे. असे ही डॉ.बारसागडे यांनी सांगितले.
तसेच “सेव नेचर सेव लाईफ” ह्या माध्यमामधून शासकीय आश्रम शाळा बोरगाव/बाजार येथे वृक्षारोपण कार्यक्रम शाळेचे माजी प्राचार्य,पर्यावरण रत्न, व मित्र तथा रोटरीयन डॉ.जगदीश बारसागडे यांच्या हस्ते आणि शासकीय सेवा निवृत्त आदिवासी विकास विभाग संघटनेचे अध्यक्ष तथा पर्यावरण मित्र जगदीश तिवारी, कोषाध्यक्ष तथा पर्यावरण मित्र आनंद नळपते, शासकीय आश्रमशाळेचे प्राचार्य नरेन्द्र भाकरे तसेच इतर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांच्या उपस्थित पार पडले.