जिल्हाधिकारी गोंदिया यांचा उद्या देवरी तालुक्याचा दौरा

■ आमदार कोरोटे यांचा नेतृत्वात ग्रामीण भागातील समस्येविषयी होणार पाहणी व चर्चा

देवरी २२: आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या देवरी तालुक्यातील देवरी, चिचगड , पालांदूर (जमी.) व चिमनटोला या भागातील ग्रामीण क्षेत्रात विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक समस्या आहेत. त्या समस्या तातडीने सोडविण्या करीता. या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांचा नेतृत्वात शनिवार (ता.२३ जुलै) रोजी सकाळी ११ वाजे पासून गोंदियाचे जिल्हाधिकारी नयना गुंडे व त्यांचे चमूने देवरी तालुकाचा दौरा आयोजीत केला आहे.
या तालुक्यातील दौऱ्यावर गोंदियाचे जिल्हाधिकारी नयना गुंडे , उपजिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक ,उपवनसंरक्षक , जिल्हा नियोजन अधिकारी सहभागी होणार असून ही चमू तालुक्यातील देवरी, चिचगड , पालांदूर (जमी.) व चिमणटोला या भागातील जुंभली, करूझरी, रोपा , ढोढरा अशा अनेक ग्रामीण क्षेत्रातील गावाला भेट देऊन लोकांशी रस्ते ,पुल सिंचन , वीज अशा विविध समस्यांचे निराकरण करण्याकरीता विकासात्मक विषयावर चर्चा करणार आहेत. या दौऱ्या दरम्यान देवरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,शेतकरी, रोजमजुर ,सुशिक्षित बेरोजगार व सर्वसामान्य नागरिकांनी वेळवर उपस्थित राहून आपल्या क्षेत्रातील समस्या मांडाव्या असे आवाहन क्षेत्राचे आमदार कोरोटे यांनी केले आहे.

Share