7 ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन न्यू दिल्ली येथे

गोंदिया:
7 ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन तालकटोरा इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात अधिवेशनाची तयारी सुरु आहे.
ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे, कलम 243(T) व 243(D) सेक्शन 6 मध्ये बदल करून ओबीसींना 27% आरक्षण साठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृहासाठी, ओबीसी विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळण्यासाठी ओबीसी शेतकऱ्यांना 100% सबसिडी वर योजना लाग़ू करण्यात याव्या. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्यासाठी, क्रिमिलियरची मर्यादा वाढवण्यासाठी व राज्याच्या व केंद्राच्या इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी या बाबींवर अधिवेशनात मंथन होणार आहे. या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, छत्तीगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलीन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भगवान कराड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव,माजी मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष जस्टीस ईश्वरया, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री जयदत्त सिरसागर, खासदार गणेश सिंग, खासदार वड्डीराजू रवींद्र, खासदार बड्डुला यादव, खासदार राम मोहन नायडू, खासदार राम चंद्रा जागरा, खासदार बाळूभाऊ धानोरकर, खासदार रामदार तडस, खासदार सुशील मोदी, खासदार विलसन, माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहीर, खासदार डॉ. के. लक्ष्मण, खासदार भारत मार्गणी, खासदार मिसा भारती,माजी खाजदार राजकुमार सैनी, आमदार किसन कातोरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विजय वडेट्टीवार ,आमदार भाई जयंत पाटील,माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आमदार रामकुमारी ढिल्लोन, आमदार परिणय फुके, माजी मंत्री संजय कुंटे यांच्यासह इतरही मान्यवरांना निमंत्रित केले आहे. अधिवेशनात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालु प्रसाद यादव यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
या अधिवेशनाला देशभरातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सहसचिव शरद वानखेडे, महामंत्री मुकेश नंदन, प्रा. शेषराव येलेकर, युवा महासंघाचे अध्यक्ष सुभाष घाटे, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनोज मेंढे, कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, युवा जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, महासचिव सुरज नशिने, महिला जिल्हाध्यक्ष दिव्या भगत, युवती जिल्हाध्यक्ष शिखा पिपलेवार सहित महासंघ, कृती समिती, सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
……..

Share