देवरी येथे वृक्षदिंडी व प्लास्टिक बंदी जनजागृती कार्य्रकम उत्साहात संपन्न

■ लायंस क्लबचे अध्यक्ष पारस कटकवार यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

देवरी 21 : लायंस क्लब देवरी व मनोहरभाई पटेल जूनियर कॉलेज देवरीचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने लायन्स क्लब देवरीचे अध्यक्ष पारस कटकवार यांच्या वाढदिवसानिमित्य पर्यवारणाच्या संरक्षणार्थ देवरी येथे वृक्षदिंडी व प्लास्टिक बंदी जनजागृति कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक व बिस्किट पैकेट चे वितरण करुण देवरी शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने लायंस क्लब चे अध्यक्ष पारस कटकवार, सचिव आफताब शेख , कोषाध्यक्ष ज्योति रामटेककर, कैबिनेट ऑफिसर पिंकी कटकवार, सदस्य अनिल मेश्राम, मनोज मेश्राम, मनोहरभाई पटेल जूनियर कॉलेजचे प्राचार्य के.सी.शहारे, उपप्राचार्य जी.एम.मेश्राम, टी.आर.देशमुख, मधुकर शेन्द्रे, शामराव देशमुख, मुनघाटे , यादोराव पंचमवार, पालक संगीता पाटिल तसेच क्लबचे इतर पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या आयोजना करिता मनोहरभाई पटेल जूनियर कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी आणि क्लब च्या पदधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share