औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे सविता पुराम यांच्या उपस्थित वृक्षारोपण

देवरी 21: औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे जिप सदस्य सविता पुराम यांच्या उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तुमडाम आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

सर्वप्रथम सविता पुराम यांना पुष्पगुच्छ देऊन प्राचार्यांनी संस्थेच्या वतीने स्वागत केले. यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी सर्व विभागातील विद्यार्थी , प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share