देवरीचे सभापती अंबिका बंजार यांची तालुक्यातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना भेट
देवरी 21: आदिवासी नक्षलग्रस्त भाग म्हणून देवरी तालुक्याची ओळख आहे. शिक्षणाचा दर्जा आणि चिमुकल्या बालकांचा शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने तालुका प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. याची प्रत्येक्षात दखल घेण्यासाठी देवरी पंचायत समितीचे सभापती अंबिका बंजार यांनी आंभोरा येथील प्राथमिक शाळेला आणि अंगणवाडी केंद्राला भेट दिली. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वर्पे यांच्यासह शाळेतील शिक्षक , गावकरी उपस्थित होते.