ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक रंगली

देवरी 21 जुलै : स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल देवरी येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा लोकशाही पद्धतीने शालेय निवडणूक राबविण्यात आली. खऱ्या लोकशाहीचे धडे शालेय जीवनातच विध्यार्थ्यांच्या अंगी रुजावे आणि सुजाण तसेच कर्तव्य दक्ष लोकप्रतिनिधींची भूमिका विध्यार्थ्यांना कळावी. राजकीय आणि निवडणूक पद्धतीची जागरूकता शालेय जीवनातच व्हावी या उद्देशाने शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी सदर निवडणुकीचे आयोजन केले. सदर निवडणुकीची पूर्वतयारी विशेष निवडणूक अधिकारी नेमून करण्यात आलेली होती. बायलॉट पेपर, मतदान कक्ष, बोटावर शाही, गुप्त मतदान पद्धती, मतदान बूथ या पद्धतीची तयारी शालेय परिसरात करण्यात आलेली होती. शालेय वातावरण एखाद्या राजकीय निवडणुकी सारखे बघावयास मिळाले. सदर निवडणुकी मध्ये बूथ १ वर ९८ टक्के मतदान आणि बूथ २ वर ९९ टक्के मतदान झाले. सदर निवडणूकी मध्ये शाळा प्रतिनिधी साठी निल रितेश अग्रवाल आणि संस्कृती सुभाष लांजेवार निवडून आले. सांस्कृतिक प्रमुख गुंजन प्रमोद रोकडे आणि इशिता चरणदास उंदीरवाडे, इशिका प्रशांत काळे , क्रीडा प्रमुख ओजस देशमुख , सिमरन राऊत , साक्षी मेश्राम , आरोग्य प्रमुख पूर्वा कुंडलेकर, स्वच्छता प्रमुख संचिता सेन्द्रे यांची निवड झाली. मतदान प्रचारानंतर ही निवडणूक अधिकच चुरशीची झाली होती. सदर निवडणुकी मध्ये निल अग्रवाल यांनी 219 मते मिळवून आणि संस्कृती अग्रवाल हिने 224 मते मिळवून आपला विजय पक्का केला. विशेष म्हणजे दरवर्षी प्रमाणे विजयी झालेल्या विध्यार्थ्यांना येणाऱ्या स्वातंत्र दिनी प्रमुख अतिथी आणि ध्वजारोहण करण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्या मध्ये उत्सुकता बघावयास मिळाली. निवडणूक अधिकारी म्हणून राहुल मोहुर्ले, नामदेव अंबादे, नितेश लाडे, सरिता थोटे , वैशाली मोहुर्ले, गुंजन जैन यांनी भूमिका बजावली. सर्व शिक्षकांनी आपली मोलाची भूमिका बजावली. संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल आणि प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share