समर्थ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

Lakhni: स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे आज 13 जुलै रोज बुधवार ला महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुपौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्रा.अरुण कडबे उपस्थित होते. यावेळी प्रा.अरुण कडबे यांनी गुरू आणि सद्गुरू यातील भेद विषय करून सांगितला. गुरू प्रमाणे सद्गुरुंचे जीवनात महत्त्वपूर्ण स्थान आहे असे त्यावेळी बोलत होते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे बोलत असताना ते म्हणाले की, आपल्या गुरू या पदाला शोभेल असे योगदान सर्व शिक्षकांनी दिले पाहिजे. प्रत्येकाकडून काहीना काही शिकायला मिळते ते आपले गुरूच आहेत. आपण काळाला अनुसरून वागलो तर आपल्याला गुरूचे आशीर्वाद लाभेल, असे ते याप्रसंगी म्हणाले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील इतर प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रा राखी बावनकुळे यांनी गुरूंची महती काव्यातून गायन केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन डॉ अनिता दाणी, आभार पद्मजा कुळकर्णी यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share