लिपीक सुशील शेंद्रे यांचा सेवानिवृत्ती सत्कार


देवरी येथील वंदना हायस्कूल मधील लिपीक सुशील शेंद्रे यांचा ३० जूनला जिल्हा क्रीडा मार्गदर्शक अधिकारी मनोज उईके यांच्या अध्यक्षतेखाली सपत्नीक शाल, श्रीफळ आणि वस्तू भेट देऊन सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.
शेंद्रे हे देवरी येथील वंदना हायस्कूलमध्ये १९९३ पासून लिपीक पदावर कार्यरत होते. ते सदर विद्यालयात पूर्ण वेळ नोकरीचे कर्तव्य पूर्ण करुन सुद्धा इतर वेळेत अनेक वर्षांपासून विविध सामाजिक तथा धार्मिक समाजकार्याशी जुडून सेवाकार्य करीत आहेत. यात विशेष म्हणजेच, सुशील शेंद्रे हे देवरी येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरचे सचिव आहेत. आणि सेवानिवृत्ती दिवस सुद्धा त्यांचा जन्मदिवस होता.
सेवानिवृत्ती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंदना हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. बुराडे, बाबुराव मडावी विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत चुटे, सर्व शिक्षक वृंद आणि इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक मांडून संचालन डी. एस. बंसोड यांनी केले. तर, उपस्थित सर्वांचे आभार कु. आय. व्ही. गभणे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share