आमगांव तालुक्यातील शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहु नये आमदार कोरोटे यांचे बैंक अधिकाऱ्यांना निर्देश

■ आमगांवच्या तहसील कार्यालयात पिक कर्ज आढावा बैठक

आमगांव, ता.०८: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील आमगांव येथील तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी (ता.७ जुलै) रोजी शेतकरी पिक कर्ज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी उपथित सर्व बैंकेतील अधिकाऱ्यांना आमगांव तालुक्यातील शेतकरी हे पिक कर्जापासून वंचित राहु नये असे सूचना व निर्देश दिले.
ही आढावा बैठक आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी आमगांवचे तहसीलदार कुंडाकुर्ले, तालुका काँग्रेस चे अध्यक्ष संजय बहेकार, जि.प.सदस्य छबूताई ऊके, पं.स.सदस्य नंदू कोरे, तारेंद्र रामटेके, आमगांवचे सहाय्यक निबंधक श्री. गायधने, जिल्हा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष उज्ज्वल ठाकुर, किसान काँग्रेस चे तालुकाध्यक्ष गणेश हुकरे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सौ. उपराडे मैडम, अनुसूचीत जाती काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष रामेश्वर शामकुंवर काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष संजय डोये, काँग्रेस चे सक्रिय कार्यकर्ता महेश ऊके, राधाकिशन चूटे, नरेश बोपचे, तसेच महाराष्ट्र बैंक, बैंक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बैंक, कैनरा बैंक, ग्रामीण बैंक, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेतील सर्व शाखा प्रमुख व त्यांचे प्रतिनिधि आणि सहकारी संस्थेचे संस्था निबंधक यांच्यासह सेवा सहकारी संस्थेचे सर्व सचिव आणि शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे आर्थिक रित्या हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला शासनाने ठरवून दिलेल्या निर्देषणासुनार येत्या ऑगस्ट पर्यन्त सर्व शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करण्याचे निर्देश आमदार कोरोटे यांनी यावेळी दिले आणि जर कोणतेही शेतकरी पिक कर्जापासून वंचित रहिल्यास किंवा बैंकेतुन शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास. त्या बैंकेतील अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना ही आमदार कोरोटे यांनी बैंक अधिकाऱ्यांना दिल्या.
या दरम्यान या बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार कोरोटे यांना आपआपल्या समस्या सांगितल्या.

Share