गोंदियातील 84 गावांत आदर्श आरोग्य गाव स्पर्धा

गोंदिया: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा 75 वर्षानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. मोहिमेंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील निवड झालेल्या 84 गावांमध्ये आदर्श आरोग्य गाव स्पर्धा मोहिम राबविले जाणार असून तब्बल 28 प्रकारच्या बाबींचे मुल्यांकन करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातही Ideal Health Village Comp आरोग्याच्या उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. त्यातच शासनस्तरावरून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून शासनाने आदर्श आरोग्य ग्राम स्पर्धा सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी गोंदिया जिल्ह्यातील 84 गावांची निवड झाली आहे. यात गोंदिया तालुक्यातील 15, गोरेगाव 12, आमगाव 9, तिरोडा 8, सालेकसा 3, देवरी 14, सडक अर्जुनी 5, अर्जुनी मोर तालुक्यातील 18 गावांचा समावेश आहे. पुढे मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील 84 गावे मॉडेल हेल्थ व्हिलेज करणेची कार्यवाही करण्यात येणार आहे. या गावांमध्ये प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, उपशामक व पुनर्वसनात्मक सेवा अंतर्भूत राहतील.

यामध्ये प्रसुतिपुर्व व प्रसुती सेवा, नवजात अर्भक व नवजात बालकांना दिला जाणार्‍या सेवा, बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा, कुटुंब नियोजन, गर्भनिरोधक सेवा, कीटकजन्य आजार व साथरोग संदर्भातील सेवा, असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी, नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजार संबंधीच्या सेवा, दंत व मुखरोग आरोग्य सेवा, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा, आयुष व योग, दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसनाअंतर्गत त्यांना प्रमाणपत्रे देण, सामान्य रोगांसाठी बाह्य रुग्ण सेवा, प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेसाठी या सर्व गावात योगासनांचे सत्र आरोग्यवर्धिनी केंद्रात व गावातील सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे घेण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा, बचतगट, ग्रामसभांचे माध्यमातून योगा, मॅरेथॉन, वाकेथॉन इत्यादी विविध खेळांचे आयोजन करण्यात येणार आहेत. याशिवाय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील दोन महिने हे अभियान राबवण्यात येणार आहे.

Share