जिल्हा परिषद शाळाची आढावा सभा संपन्न

देवरी 09: जिल्हा परिषद क्षेत्र पुराडा अंतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळाची आठावा सभा सविता संजय पुराम सभापती महिला व बालकल्याम जि.प.गोंदिय यांच्या अध्यक्षतेखाली, ममता अंबादे सदस्या पं. स. देवरी, महेंद्र मोटघरे गट शिक्षणाधिकारी पं.स.देवरी, धनंजय कावळे गटसमन्वयक बी आर.सी देवरी, एस.टी. गजभिये केंद्र प्रमुख लोहारा , जगणे केंद्रप्रमुख डोगरगाव यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत जि. प. क्षेत्र पुराडा अंतर्गत जिल्हा परिषद शाळातील अडचणीवर चर्चा करताना प्रत्येक मुख्याध्यापकाना त्यांच्या शाळेतील अडचणी विचारूण त्या दुर करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यात, वीज बिल , शिक्षकांची रिक्त पदे, वर्गखोल्या आवार भिंत, पिण्याचे पाणी व इतर समस्यावर चर्चा करुण त्या लवकरात लवकर उपाय करण्याचे आश्वासन सभापती महोदयानी दिले. आढावा सभेत गटशिक्षणाधिकारी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.

सभेचे प्रास्ताविक एस. टी. गजभिये केंद्रप्रमुख यांनी तर सुत्रसंचाल दिपक लांजेवार यांनी केले सभेला सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share