देवरी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवू – सुनील मिश्रा

देवरी तालुका शिवसेना प्रमुख सुनील मिश्रा यांचे प्रतिपादन
जि.प.च्या विश्रामगृहात शिवसेनेच्या देवरी शहर विभागाची सभा

सभेत देवरी शहरातील अनेक महिला पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश.

देवरी, ता. १९; गाव तिथे शाखा; घर तिथे शिवसैनिक या संकल्पनेतून देवरी शहरात शिवसेना आपला पक्ष बळकट करित आहे. त्याच अनुसंघाने आज देवरी शहरात मोठ्या संख्येने महिला व पुरुष शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे आगामी नगरपंचायतीच्या नगर सेवकाचे निवडणुकीत घवघवीत यश संपादन करुण देवरीच्या नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवून असे प्रतिपादन शिवसेनेचे देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी केले.

देवरी येथील जि.प.च्या. विश्रामगृहात सोमवारी( ता.१४ डिसेम्बर) रोजी आयोजित देवरी शहरातील विभागाच्या सभेत उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते. ही सभा ,गोंदिया जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.


या प्रसंगी गोंदिया जिल्हा महिला प्रमुख अनुसयाताई सोनवाने, देवरी तालुका प्रमुख सुनील मिश्रा, देवरी शहर प्रमुख राजा भाटिया, विधानसभा संघटक राजिक खान, युवा सेनेचे कगेश राव, शिक्षक सेनेचे तालुका प्रमुख अनिल कुर्वे, शहरप्रमुख सुभाष दुबे, छन्नू नेवरगड़े, शिवसेनेचे उपशहर प्रमुख महेश फुन्ने, इकबाल पठान, पं.स.चे उपसभापति गणेश सोनबोइर, सौ.वंदनाताई राऊत, सौ.करुणा कुर्वे, सौ. सलमा राऊत, राजा मिश्रा, दिवाकर सोनवाने, कृष्णा कांबळे, मंगेश चौबे यांच्यासह श शहरातील बहुसंख्य शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.


या सभेत देवरी नगरपंचायत च्या आगामी निवडणूक बाबद सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेनेत प्रवेश करणारी सौ. प्रीति उइके हिला देवरी शहर महिला आघाडी प्रमुख तर कु. स्वीटी नेवरगड़े हिला देवरी शहर युवती प्रमुख पदी नियुक्ति पत्र देऊन आणि जिल्हा महिला प्रमुख सौ. अनुसयाताई सोनवाने यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला तसेच देवरी वार्ड क्र.१५, वार्ड क्र.१२ व वार्ड क्र.५ येथील अनेक महिला पुरुषांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला. या सर्वाचे उपस्थित अतिथीन्नी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले.


या सभेचे प्रास्ताविक तालुका प्रमुख सुनील मिश्रा यांनी तर संचालन युवा सेनेचे देवरी शहर प्रमुख देवराज जगने यांनी आणि उपस्थितांचे आभार देवरी शाहर प्रमुख राजा भाटिया यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share