देवरी येथे शहर व ग्रामीण काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
देवरी, ता.१९: बऱ्याच दिवसांपासून नगरपंचायत, जि.प.,पं.स. व ग्रा.पं.च्या निवडणुकीची चाहुल लोकांना लागली आहे. पूर्वी निवडणुक कार्यक्रम जाहिर व्हायला होते परंतु आता जाहिर झाले आहे. माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकनिष्ठेने सोबत होते. माझ्या मार्गदर्शनात निवडणुकीत त्यांनी काम केले. त्यांच्या परिश्रमामुळेच मी आज आमदार झालो आता शहरासह ग्रामीण क्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहत आहे. अशावेळी त्यांना आता वाऱ्यांवर सोडावे कां? नाही! माझ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सैनिक बनून फिरला. आता शहर व ग्रामीण भागातील निवडणुकीत मी कोणत्याही प्रकारची कमी पडू देणार नाही,कारण आता हा आमदार नेता तुमच्या पाठीशी खंबीरपने उभा असल्याचे प्रतिपादन आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
ते देवरी येथे कोरोटे भवनासमोर शुक्रवारी(ता.१८ डिसेम्बर) रोजी तालुका काँग्रेस पक्षातर्फे आयोजित शहरी व ग्रामीण काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्याचे उध्द् घाटन गोंदिया जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्ति कार्याध्यक्ष रत्नदिप वहीवले यांच्या हस्ते आणि आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी काँग्रेसचे नेते तथा जि.प.चे माजी सभापति राजेश नंदागवळी, गोंदिया जिल्हा महिला काँगेस अध्यक्ष उषाताई शहारे, काँग्रेस पक्षाचे देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, माजी जि.प.सदस्य माधुरीताई कुंभरे, मोतीराम सयाम, माजी पं.स.सदस्य सोनू नेताम, लखनीबाई सलामे, उत्तम मड़काम सामाजिक कार्यकर्ता सीमाताई कोरोटे, कमलाताई सराटे , किरण राऊत, हमीद मेमन, मिनाताई राऊत यांच्या सह देवरी शहर व ग्रामीण क्षेत्रातील काँग्रेस च्या सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, पुरुष व युवक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी गोंदिया जिल्हा काँग्रेस चे नवनियुक्ति कार्याध्यक्ष रत्नदिप दहीवले यांचे आमदार कोरोटे व देवरी तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कडून स्वागत-सत्कार करण्यात आले.
या दरम्यान देवरी शहरातील मिनाताई राऊत व त्यांची महिला चमुने आणि देवरीचे हमीदभाई मेमन यांच्या सह त्यांची युवकाच्या चमुने आमदार सहषराम कोरोटे यांच्या विकास कार्यावर प्रभावित होऊन आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या मेळाव्यात प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप भाटिया यांनी तर मंच संचालन माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके यांनी आणि उपस्थितांचे आभार युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष नरेश राऊत यांनी मानले.
या मेळाव्याच्या आयोजनार्थ तालुका काँग्रेस चे अध्यक्ष संदीप भाटिया, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष बबलू कुरैशी, कमलेश पालीवाल, छन्नूलाल मुंगनकर, नरेश राऊत, ओमप्रकाश रामटेके,अमित तरजुले व सुभ्रदा अगळे यांच्या सह तालुक्यातील सर्व काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.