शेतकऱ्यांना बारदाना उपलब्ध करून द्या आणि खरेदी धानाची त्वरित उचल कर.
गोंदिया जिल्हा आदिवासी संस्थेच्या संघातर्फे मागणी.
या संबंधात मुख्यमंत्री, विधानसभाअध्यक्ष व संबधित विभागाला निवेदन सादर.
देवरी, ता.19; देवरीच्या शक्ति मैदानातील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सभागृहात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संघातिल गोंदिया जिल्ह्याचे पदाधिकारी व संचालकांची सभा घेण्यात आली. या सभेत धान खरेदी केन्द्रावरील शेतकऱ्यांना बारदाना त्वरित उपलब्ध करुण द्या आणि खरेदी धानाची तातडीने उचल करा अशा अनेक विषयावर चर्चा करुण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राज्याचे आदिवासी विकास अध्यक्ष के.सी. पाढवी, आदिवासी विकास महामंडळ मर्या नाशिक, भंडाराचे प्रदेशिक व्यवस्थापक यांना निवेदन पाठवून सदर मागणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे
सभा संघाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष शंकर मडावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी जिल्हा सचिव हरिषभाऊ कोहळे, डवकी संस्थेचे अध्यक्ष मेहत्तरलाल कोराम, उपाध्यक्ष भास्करभाऊ धर्मशहारे, बोरगांव/बाजार संस्थेचे सूकचन्द राऊत, मुल्ला संस्थेचे कृपाशंकर गोपाले, रामेश्वर नरेटी, रघुनाथ कुरसुंगे, मनोज विश्वकर्मा, संतोश मडावी, दिलीप कांबळे, राजेश राउत, भास्कर मानकर, इंसाराम मानकर, शामलाल खांडवाये, पंचलाल मडावी, लक्षमण लटये, लक्षमण मानकर, नरेश ताराम, मुकुंदा मळकाम, तुलाराम मारगाये,सेगु कोवे, संताराम मडावी, राजू सागरकर यांच्या सह जिल्ह्यातील सर्वआदिवासी संघेतील पदाधिकारी व संचालक गन बहुसंख्येने उपस्थित होते.
या सभेत आदिवासी संस्थेअन्तर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात संस्थेचा शासनाकडे असलेले मागील कमीशन त्वरित मिळने , शेतकऱ्यांना शासनातर्फे धानखरेदी केन्द्रावर नवीन बारदाना उपलब्ध करुण देने अन्यथा शेतकऱ्यांना बारदानाचे पैसे देणे, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांचे धानही खरेदी केन्द्रावर घेण्यास मंजूरी देण्याबाबद, खरेदी केन्द्रावर खरेदी केलेल्या धानाची त्वरित उचल करण्याबाबद, शासनाने खरेदी केन्द्रावर आधारकार्ड बाबद शिथिलता देने अशा अनेक विषयावर चर्चा करुण राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष व संबंधित विभागाला निवेदन सादर करुण सदर सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली.