कृषि विभाग देवरी तर्फे जमिन आरोग्य पत्रिका वाटप

देवरी १८: पाऊलझोला ता.देवरी जि.गोंदिया येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषिविभागाच्या वतीने जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आले होते..या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक देरीचे तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम व चिचगडचे मंडळकृषिअधिकारी चंद्रकांत कोळी यांची उपस्थिती होती..या शेतकरी मेळाव्यात मातीपरिक्षणाचे महत्व व जमीन आरोग्य पत्रिका वाचन कसे करावे हे सविस्तरपणे विषद करण्यात आले. तसेच मंडळ कृषिअधिकारी चंद्रकांत कोळी यानी “सुपिक माती समृध्दशेती” ,खोडकीडा, गादमाशी,तुडतुडे निर्मुलन इत्यादी विषयावर सविस्तर व्याख्यान दिले . चिचगडचे प्रभारी कृषिपर्यवेक्षक वाढई यानी मातीचा नमुना कसा घ्यावे याबाबत व शासकीय योजना,अनुदान पध्दती याबाबत मार्गदर्शन केले .. या शेतकरी मेळाव्यासाठी पुरुष, महिला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते..मेळावा यशस्वी करण्यासाठी कृषिसहाय्यक कठाणे,हुडे, गावळ, यानी परिश्रम घेतले आहे. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन रेहडीचे कृषिसहाय्यक एच.झेड.शहारे यानी केले व कृषिपर्यवेक्षक श्री. वाढई यानी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share