कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे शुभारंभ

देवरी 28: महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवरी च्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाचे शुभारंभ तालुक्यातील मौजा मुल्ला येथील ग्रामपंचायत परिसरात करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ गौपाले, तंटा मुक्ती अध्यक्ष यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थितीत जी.जी. तोडसाम, तालुका कृषी अधिकारी, देवरी, व्ही. एन. कुंभारे, मंडळ कृषी अधिकारी, देवरी, येडाम, कृषी पर्यवेक्षक, देवरी, कृषी सहाय्यक के.जे. सलामे, प्रशांत सावलकर, बी. पी. डोंगरवार, अजय कडव, संजय कापगते, आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, सेवार्थ शेतकरी उत्पादक कंपनी चे संचालक पुरणभाऊ मटाले तसेच गावातील शेतकरी गटाचे सभासद सीताराम मेंढे, मुकेश राऊत, केशवराव भुते, यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम येडाम यांनी कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषा व दिनांक 25 ते 1 जुलै 2022 पर्यंत राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती सांगितली तसेच बीजप्रक्रिया बाबत माहिती दिली.
सावलकर यांनी भात शेतीमध्ये अझोलाचा वापर व तयार करण्याची पध्दती तसेच अझोल्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर बी.पी. डोंगरवार यांनी शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम योजनेबाबत माहिती दिली. यानंतर अरविंद उपवंशी यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पीक प्रात्यक्षिक व शेतीशाळा बाबत माहिती दिली व प्रात्याक्षिक बियाणे भात वाण pdkv किसान व pdkv साकोली रेड राईस 1 वाणाचे बियाणे 3 किलो प्रती शेतकरी व बीजप्रक्रिया करीता जिवाणूसंघ 100 मिली प्रति शेतकरी वाटप करण्यात आले. तसेच स्मार्ट व प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर व्ही.एन. कुंभारे यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजना यामध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा, महाडीबीटी पोर्टलवर शासनाच्या सर्व योजना उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन यावेळी केले. यानंतर तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करतेवेळी घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या कृषी विभागाच्या योजना महाडीबीटी पोर्टल वर उपलब्ध असून शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच मूल्य साखळी बळकटीकरण करणे करण्यासाठी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून बाजारात विक्री करावे जेणेकरून जास्तीच्या आर्थिक फायदा शेतकऱ्यांना यापासून मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ गौपाले यांनी उपस्थितांनी उपस्थितांना कृषी विभागाच्या योजना च्या भरपूर लाभ घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन के.जे. सलामे, कृषी सहाय्यक यांनी केले तर आभार सावलकर यांनी मानले. सदर कार्यक्रमात गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share