ब्लॉसमच्या चिमुकल्यांनी ‘कागदी नाव’ बनवून केला पावसाळ्याचा स्वागत
देवरी 22: तालुक्यातील अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कागदी नाव बनवून पावसाळ्याचा स्वागत केला. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कृतियुक्त शिक्षण पद्धती महत्वाची आहे.
नुकताच पावसाळा ऋतूला सुरुवात झाली असून लहान मुलांना पावसात भिजण्याची जास्त आवडत असते. याच संकल्पनेतून शाळेचे प्राचार्य डॉ सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनात केजी च्या विद्यार्थ्यांना कागदापासून नाव बनविण्याचे धडे शाळेत देऊन पावसाळ्याचे आगळेवेगळे स्वागत विद्यार्थ्यांनी केले.
सदर उपक्रमामध्ये केजी वर्गाच्या शिक्षिका कलावती ठाकरे , मनीषा काशीवार , योगिता मेश्राम यांनी चिमुकल्यांना कृतियुक्त शिक्षणातून कागदी नाव बनविण्याचे प्रशिक्षण देत यशस्वी उपक्रम राबविला.