महालगाव आंदोलनप्रकरणात 19 जणांची कारागृहात रवानगी

गोंदिया: तिरोडा-धापेवाडा मार्गावर 15 जून रोजी झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलन व त्याप्रसंगी पोलिस कर्मचार्‍यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणात आज, 22 जून रोजी 19 जणांना ताब्यात घेतले. दरम्यान या सर्वांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी ठोठावली असून भंडारा कारागृहात रवानगी केली आहे.

तिरोडा-धापेवाडा मार्गावर महालगाव-मुरदाडा शिवारात 15 जून रोजी अवैधरित्या रेती वाहून नेणार्‍या टिप्पर व ट्रॅक्टरमध्ये धडक झाली होती. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू व तिघे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्परला जाळून दुसर्‍या दिवशी चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिस व ग्रामस्थांमध्ये संषर्घ झाल्याने काही पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान पोलिसांवर हल्ला प्रकरणी आज, 22 जून रोजी 19 जणांना ताब्यात घेतले. यात पुरुषोत्तम नागपुरे, शेषराव नागपुरे, अंकूश बंभारे, अनिल आगासे, जियालाल नागपुरे, प्रमेल नैकाने, राकेश मस्करे, दिनेश मस्करे, राजेश नागपुरे, छोटेलाल नागपुरे, योगेश नैकाने, विनोद नागपुरे, राजू आगासे, यशवंतराव आगासे, मनोज नागपुरे, शैलेश नागपुरे, शैलेश सीमा नागपुरे व नितीन खतवार यांना ताब्यात घेतले. दरम्यान, आज, 23 जून रोजी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली असून त्यांची रवानागी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे. पुढील तपास दवनीवाडा पोलिस करीत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share