भाजपच्या वतीने १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा

देवरी 22: भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका-देवरी यांच्या वतीने देवरी तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे उद्या (23) ला आयोजन करण्यात आले आहे.

देवरी तालुक्यातील आश्रमशाळा व इतर सर्व शाळेतील इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार सोहळामध्ये सर्वांना आमंत्रित करण्यात आले असून सर्व गुणवंत विद्यार्थी, शाळेतील मुख्याध्यापक तसेच पालकांनी उपस्थित राहावे असे निमंत्रणाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम दि. २३ जुन २०२२ रोज गुरुवार ला सकाळी १०.०० वाजता भाजप कार्यालय, प्रमोद संगीडवार यांच्या घरी, देवरी जि. गोंदिया येथे आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे आयोजक सविता संजय पुराम (महिला व बालकल्याण सभापती,जि.प.गोंदिया), देवकीताई मरई (तालुकाध्यक्षा भाजप महिला आघाडी देवरी), अंबिकाताई बंजार (तालुका महामंत्री भाजप महिला आघाडी देवरी), अंजुताई बिसेन (तालुका महामंत्री भाजप महिला आघाडी देवरी), अर्चनाताई येटरे (तालुका महामंत्री भाजप महिला आघाडी देवरी) यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share