उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

प्रहार टाईम्स

देवरी 21: पोलीस अधिक्षक. तसेच अपर पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्हात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वक्तृत्व स्पर्धा ही १० वर्षे ते २२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्याकरीता आयोजीत केली असुन निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्यास स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.

१० ते १४ वर्षे वयोगट

विषय: १) छत्रपती शिवाजी महाराज २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३) माझे गाव माझी शाळा

१५ ते १८ वर्षे वयोगट

विषय:१) आदिवासी एक संस्कृती २) वृक्षतोड एक आव्हान ३) विर बिरसा मुंडा – युगपुरुष

१९ ते २२ वर्षे वयोगट

विषय: १) सोशल मिडीया शाप की वरदान २) भारतीय संविधान ३) कुपोषण – ज्वलंत प्रश्न

वरील पैकी एक विषयाचा ५ मिनीटांचा (मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेत) व्हिडीओ तयार करुन दि. ३०/०६/२०२२ च्या १८.०० वा च्या आत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय देवरी येथील व्हॉट्सअप मो. क्र. ९०११०५६८१६, ९५४५१५५३८४ वर तयार करण्यात आलेला व्हिडीओ पाठवावा. व्हिडीओ पाठवितांना विद्यार्थ्याचे संपुर्ण नाव, वय, शाळेचे नाव नमुद करावे. सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आवाहन केले आहे

Print Friendly, PDF & Email
Share