समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे गुणवंतांचा सत्कार
विज्ञान आणि वाणिज्य विभागाचा 100% निकाल
राष्ट्रीय शिक्षण संस्था, द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील एच. एस. सी. परीक्षा मार्च २०२२ निकाल लागला असून विज्ञान विभागात एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी ९१ उत्तीर्ण ९१ शेकडा प्रमाण १०० प्रेरित विकास काशिवार, आदित्य संजय डुंभरे, कु. अवंती विजय डुंभरे असून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आहेत. वाणिज्य विभागात एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी ५४ उत्तीर्ण ५४ शेकडा प्रमाण १०० निकाल लागला असून कु. रागिनी रमेश कामथे, कु. हिमांशी उमाशंकर क्षिरसागर, कु. श्रध्दा उमेश बाते अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे. कला एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी ११४ उत्तीर्ण १०८ शेकडा प्रमाण ९४.७३ निकाल लागला असून कु. हर्षदा प्रमोद सावरकर, कु. शितल रमेश बावणे, कु. श्रेया राजु काटगाये अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वागत आणि सत्कार संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, संस्था संचालक शिवलाल रहांगडाले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे, प्रा. अशोक गायधनी, प्रा धनंजय गिऱ्हेपुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्रेया राजु काटगाये, रागिनी रमेश कामथे, प्रेरित विकास काशिवार या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. 12 वी कला विद्यार्थिनी मयुरी वंजारी हीचे आक्तमित निधन झाले यावेळी तिला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विद्यार्थी आणि पालक याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रीना साठवणे आणि आभार प्रा पद्मजा कुलकर्णी यांनी मानले.