ब्लॉसम स्कूल देवरीचा 100% निकाल, युसरा भुरा (95%) विद्यालयात प्रथम

देवरी 17- येथील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक येथील एस.एस.सी.परीक्षा -2022 करिता विद्यालयातून एकूण 11 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती.आज इयत्ता 10वी चा निकाल नागपूर बोर्डाद्वारे घोषित करण्यात आला .त्यानुसार सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

यामध्ये कु. युसरा भुरा हिने 95 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम क्रमांक , कु. मोनाली तुरकर हिने 88.60 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक, कु. आकांशा तिवारी हिने 85.80 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, वर्गशिक्षक नामदेव अंबादे , नितेश लाडे , वैशाली मोहुर्ले , सरिता थोटे , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

याचप्रमाणे कल्पवृक्ष शिक्षण संस्थेचे सचिव निर्मल अग्रवाल , अध्यक्षा अंकिता अग्रवाल तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share